अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ शाखा बीडच्या अध्यक्षपदी मा. श्री भारत चव्हाण साहेब माजी गटविकास अधिकारी यांची निवड*

 

लोकदर्शन 👉 राहुल खरात

अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ शाखा बीडची बैठक दिनांक 18/03/2023 रोजी संपन्न झाली या बैठकीचे अध्यक्ष मा. डॉ. के. बी. पैठणकर साहेब तसेच ह भ प भरत महाराज जोगी प्रा. बालकनाथ यादव सर माजी मुख्याध्यापक संजय सावंत सर श्रीमती जयश्रीताई चव्हाण श्री हरिदास बामणे माजी अध्यक्ष श्री केदारनाथ चव्हाण सर श्री हरीभाऊ भराडी (जिल्हा सचिव) श्री रंगनाथ पैठणकर (ग्रामीण अध्यक्ष) श्री दत्तात्रय शिराळकर श्री निकम साहेब श्री कानिफनाथ बामणे व बहुसंख्य नाथ बांधव यांच्या उपस्थितीत महासंघाची बैठक पार पडली या बैठकीत सालाबादप्रमाणे गोरक्षनाथ प्रकट दिनानिमित्त नाथ दीक्षाचा कार्यक्रम तसेच सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे याबाबत सविस्तर चर्चा करून नियोजन करण्यात आले.
तसेच अखिल भारतीय नाथपंथी महासंघ शाखा बीडचे अध्यक्ष म्हणून बीड जिल्ह्याचे रहिवासी सेवानिवृत्त माननीय भारत ज्ञानोबा चव्हाण एम.एस.सी.(कृषी) माजी गटविकास अधिकारी पंचायत समिती लातूर यांचे कार्य कर्तृत्व आणि महासंघ विषयीची तळमळ पाहून डॉक्टर के बी पैठणकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते निवड करण्यात आली.
तसेच मावळते जिल्हाध्यक्ष माननीय श्री केदारनाथ चव्हाण सर यांनीही त्यांच्या चार वर्षाच्या काळात संघटना जोडण्याचे कार्य अतुलनीय असे केले त्यामुळे सर्वांनी त्यांचे कौतुक केले परंतु बीड जिल्ह्यातील सर्व नाथ बांधवांना अध्यक्ष होण्याची समान संधी मिळावी म्हणून नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून श्री भारत चव्हाण साहेब यांची नेमणूक करण्यात आली त्यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही तसेच संघटना वाढीसाठी अतोनात प्रयत्न करेल व सर्व नाथ बांधवांना बरोबर घेऊन अध्यक्षपदाची धुरा चांगल्या प्रकारे सांभाळेल अशा प्रकारचे वचन दिले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जगन्नाथ निकम यांनी केले तर आभार श्री भैरवनाथ शिंदे सर यांनी मानले आणि चहापानानंतर बैठक संपली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here