आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाला यश. ♦️पं. स. जिवती येथे गटशिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधिक्षक पदांना मंजुरी.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

जिवती :– जिवती तालुक्याची निर्मिती सन २००२ मध्ये झाली मात्र गेली अनेक वर्षे जिवती पंचायत समिती येथे गटशिक्षणाधिकारी पद निर्मिती केली नव्हती. जिवती तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत मात्र येथील शिक्षण विषयक कामे शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या देखरेखीत सुरू होते. तालुका निर्मिती नंतर २० वर्ष लोटूनही शासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होते. आमदार सुभाष धोटे यानी वारंवार विधानसभेत याविषयी प्रश्न लावुन धरले. सन २०२२ च्या हिवाळी अधिवेशनात हा ज्वलंत प्रश्न लावुन धरला होता. त्यानंतरही पदनिर्मितीस विलंब होत असल्याने २०२३ च्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार धोटे यानी हा मुद्दा लावून धरला. अखेर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे शासन निर्णय क्रमांक पदनि – २०२२/ प्र. क्र. ५२ /प्र. शा-५ दिनांक १५ मार्च २०२३ रोजी पंचायत समिति जिवती येथे गटशिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधिक्षक ही पदे शासनाने मंजुर केली आहेत. जिवती तालुक्यातील शैक्षणिक अडचण आ. सुभाष धोटे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने दूर झाल्याने जिवती तालुक्यातील शिक्षक तसेच नागरिकांनी आमदार सुभाष धोटे यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here