जुन्या पेंशन साठी नगर परिषद, गडचांदूर चे कर्मचारी बेमुदत संपात सहभागी .

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अंशदायी पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी मंगळवाळ पासून राज्यातील शासकीय,निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत,
नगर परिषद, गडचांदूर येथील सर्व अधिकारी व कर्मचारी सुद्धा बेमुदत संपात सहभागी झाले आहेत,
आज संपाच्या चौथ्या दिवशी सुद्धा सर्व कर्मचारी संपात सहभागी असल्याने नगर परिषद चे संपूर्ण कामकाज ठप्प पडले आहेत नागरिक आल्या पावली परत जात असल्याने नागरिकांना नाहक त्राससहन करावा लागत आहे,
नगर परिषद कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहेत,
शासनाने या बेमुदत संपावर तातडीने तोडगा काढून त्यांच्या न्याय मागण्या मान्य करून संप मिटवावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहेत,
शासन आपले आडमुठे धोरण सोडून जुनी पेंशन योजना जोपर्यंत लागू करत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहील असे नगर परिषद गडचांदूर च्या संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे,
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here