जयश्री नगर येथील अंगणवाडी चे काम त्वरित पूर्ण करून कार्यान्वित करा,,,, ,,,,,,,,,,,,,,,,,,,, मनसे ची मागणी

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर शहरातील वॉर्ड न 6 मधील जयश्री नगर येथे गेल्या 8 ते 10 वर्षांपासून अंगणवाडी चे काम अपूर्ण अवस्थेत आहेत,सध्या येथील लहान मुले गोकुळ नगर येथील किराया च्या घरी भरत असलेल्या अंगणवाडीत जात आहेत, ही अंगणवाडी धोकादायक आहे,गडचांदूर,, पिंपळगाव रोड ओलांडताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही,गैरसोय होत आहेत, तेव्हा संबंधित विभागाने या गंभीर बाबी कडे तातडीने जयश्री नगर येथील अंगणवाडी चे काम तातडीने पूर्ण करावे, तिथे अंगणवाडी सुरु करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गडचांदूर शहर उपाध्यक्ष सिद्धेश्वर केंद्रे यांनी नगर परिषद गडचांदूर च्या मुख्याधिकारी कडे लेखी निवेदनात केली आहे,
एका महिन्यात अंगणवाडीचे रखडलेले काम सुरू करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे
निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक,तहसीलदार,उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार गडचांदूर यांना देण्यात आल्या आहेत,
,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here