सुदाम नगरी,नरसाळा. येथे “”रंगपंचमी”” स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात.

 

लोकदर्शन 👉 राहुल खरात
—————————
महादेव चौक,सुदाम नगरी,नरसाळा. येथे “”रंगपंचमी”” स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सुदाम नगरी रहिवाशांनी एकमेकांना रंग लावून रंगपचमीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष रत्नाकरजी ठवकर,अध्यक्ष टोमॅको ,प्रा.ली.प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार सुधीरभाऊ पारवे. उमरेड विधानसभा क्षेत्र. प्रमुख उपस्थित योगेशजी बन,संचालक शिक्षक सहकारी बँक, नागपूर.अजयजी बोढारे, भाजपा महामंत्री नागपूर जिल्हा.गणेशजी पुरी,अध्यक्ष गोस्वामी समाज, नागपूर. रविंद्रजी झिलपे अध्यक्ष,साई ष्ट्रस्ट,सुदाम नगरी.अमरुदजी तुमसरे अध्यक्ष सुदाम नगरी विकास समिती.यांनी हिंदु राष्ट्राची संस्कृती जोपासून समाजात एकता, बंधुभाव, आदरसन्मानाने एकमेंकांच्या सुखादुखात सदैव सोबत राहावे. असा संदेश माजी आमदार सुधीरभाऊ पारवे , योगेशजी बन व अजयजी बोढारे यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास गिरी व संचालन अमोल बोबडे व विवेकानंदजी ठाकरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूंदर आयोजन सुधाकरजी पांचाळ, सुखदेवजी माळवे,नरेन्द्रजी वानखेडे, अनिलजी बेलसरे,निलेश ढोरे,सचिन खराबे,विशाल इंगळे.व मित्र परीवार सुदाम नगरी.नरसाळा. यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here