निरंकारी सद्गुरूंचे सांगलीमध्ये दिव्य आगमन 17 मार्चला विशाल निरंकारी संत समागमाचे आयोजन ♦️भक्तगणांमध्ये अद्भुत उत्साह आणि हर्षोल्हासाचे वातावरण

 

लोकदर्शन सांगली 👉 राहुल खरात

सांगली:-13 मार्च 2023 महाराष्ट्राच्या आध्यात्मिक कल्याण यात्रे अंतर्गत विश्वबंधुत्व व एकत्वाचा दिव्य संदेश देण्यासाठी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी या दिव्य विभुतींचे सांगली नगरीत आगमन होत असून त्यांच्या पावन सानिध्यात दिनांक 17 मार्च 2023 रोजी सायंकाळी ४:३० ते ८:३० वाजेपर्यंत विशाल एक दिवसीय निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन “पद्मभूषण वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर बुधगाव येथील नियोजित विमानतळ ग्राउंड कवलापूर तासगाव रोड सांगली” या मैदानावर करण्यात येत आहे
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राज पिताजी यांच्या पावन सानिध्यात आयोजित होत असलेल्या या एक दिवसीय विशाल निरंकारी संत समागमाचा आनंद प्राप्त करण्यासाठी संपूर्ण सांगली जिल्हा व्यतिरिक्त कोल्हापूर, सोलापुर व कर्नाटक राज्य परिसरातील तसेच अन्य भागातून हजारोच्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित राहणार आहेत. सद्गुरूंच्या दिव्य आगमनाच्या प्रति भक्तामध्ये अद्भुत उत्साह आणि हर्षोल्हासाचे वातावरण दिसून येत आहे
निश्चितपणे या दिव्य संत समागमाचा उद्देश मानवामध्ये मानवी मूल्यांची जागृती करून अवघ्या विश्वामध्ये मानवतेने युक्त शांतीसुखाचे सुंदर वातावरण स्थापित करणे हाच आहे तरी सांगली परिसरातील सर्व भाविकांनी या संत समागमास उपस्थित राहुन सदगुरु माताजींचे दर्शन घेऊन अशिर्वाद प्राप्त करावेत असे आवाहन मंडळाच्या स्थानिक संयोजक यांनी केले.
————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here