माजी मुख्यमंत्री स्व यशवंतराव चव्हाण यांना महात्मा गांधी विद्यालयात अभिवादन

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व यशवंतराव चव्हाण यांची जयंती महात्मा गांधी विद्यालय, व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे 12 मार्च ला साजरी करण्यात आली,
याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपमुख्याध्यापक अनिल काकडे होते,प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे होते,
सर्वप्रथम स्व यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी प्रा माधुरी पेटकर यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनचरित्र वर प्रकाश टाकला, त्यांच्या कार्याची माहिती दिली,
कार्यक्रमात दिन विशेष समिती च्या प्रमुख प्रा,नंदाताई भोयर तथा इतर शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते, संचालन व आभार प्रदर्शन प्रा नितीन वाढई यांनी केले,
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here