ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात सत्कार स्त्री शक्तीचा कार्यक्रम संपन्न ♦️देशाच्या प्रगतीत महिलांचे अतुलनीय योगदान- किरण बोढे

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार स्त्री शक्तीचा कार्यक्रम घेण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणुन, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, प्रयास सखी मंच अध्यक्षा किरण बोढे, माजी जि.प. सभापती नितु चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्या कुसुम सातपुते, सुचिता लुटे, सत्कारमूर्ती कमला दुर्गम, सविता शाह, शांतता कमेटीच्या अमीना बेगम, पुष्पा रामटेके उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले तसेच सत्कारमूर्ती वेकोलि कर्मचारी असलेल्या कमला दुर्गम आणि सविता शाह यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी मनोगत व्यक्त करतांना प्रयास सखी मंच अध्यक्षा किरण बोढे म्हणाल्या, आज स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करीत आहे. स्त्रियांनी जमिनीवरच नाही तर अंतराळात उतुंग भरारी घेतली आहे. शिक्षण, व्यापार, विज्ञान, तंत्रज्ञान अश्या विविध क्षेत्रात स्त्रिया काम करीत आहे. देशाच्या प्रगतीत महिलांचे अतुलनीय योगदान आहे. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणुन जगभरात साजरा केला जातो.
तसेच उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

संचालन भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा पुजा दुर्गम यांनी केले

यावेळी सुनीता पाटील, चंद्रकला मन्ने, विना घोरपडे, सुमन वऱ्हाटे, प्रिया करकाडे, कल्पना वैरागडे, रेखा मेश्राम, वंदना मुळेवार, अर्चना लेंडे, सरिता सोळंके, छाया पासवान, तब्बसूम पठाण, सुनीता साहू, पुजा बोढेकर, मंदा गिरडकर, रेखा पारशिवे, शोभा कामतवार, लता कामतवार, शोभा खुसपुरे, अरुणा ठाकरे, मंदा ठेंगणे, भारती गायकवाड, सूंदरा किन्नाके, शोभा सपाटे, सुनीता हिंगाने, चेतना कपारे, सुनीता गेडाम, वंदना नाईक, मैथुला दीप, कल्पना निवलकर, ज्योती काकडे, अनघा नीत, शोभा बोबडे, वंदना परिडा, अनिता श्रीवास, रिता श्रीवास, ज्योती रामटेके, स्नेहलता दुर्गम, किरण ठमके, शिला धोबे, प्रेमीला भगत, पूनम मस्के, सुनीता यादव, मनीषा ठाकरे, रोहिणी काळे, छाया मुस्कट, ज्योती काळे व मोठया संख्येत महिला उपस्थित होत्या.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *