गडचांदुरात वीर बाबुराव शेडमाके यांना विनम्र अभिवादन.*

लोकदर्शन. गडचांदूर👉 (अशोककुमार भगत)

सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात आज स्वातंत्र्य सेनानी वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य धर्मराज काळे तसेच उपस्थित शिक्षकांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवनकार्याची तसेच त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची माहिती सांगितली. तसेच प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयातील शिक्षक बाळकृष्ण मरसकोल्हे यांनीही बाबुराव शेडमाके यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांवर औचित्यपूर्ण माहिती दिली.

कार्यक्रमाचे संचालन तथा प्रस्ताविक ज्येष्ठ शिक्षक महेंद्रकुमार ताकसांडे तर आभार भालचंद्र कोंगरे यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी सुरेश पाटील ,जीवन आडे, प्रा. मुप्पिडवार प्रा. पोडे ,प्रभाकर पुंजेकर, सिताराम पिंपळशेंडे इत्यादीनी उपस्थित राहून सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here