



लोकदर्शन 👉 अशोककुमार भगत
महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटनेची 11 वी त्रैवार्षिक आमसभा शोभाताई खैरनार यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली.महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा प्रतिनिधी या आमसभेला उपस्थित होत्या.
या सभेत चंद्रपूर जिल्ह्यातील राज्य सरचिटणीस पदी रंजना कोहपरे तर *नागपूर विभागीय उपाध्यक्ष पदी गीताताई खामनकर* यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मानद अध्यक्षपदी शोभाताई खैरनार जिल्हा नाशिक यांचा तर राज्य अध्यक्ष मीनाक्षी मुदगल जिल्हा पुणे,कोषाध्यक्ष म्हणून आम्रपाली गागुर्डे जिल्हा नाशिक,कार्याध्यक्ष नागपुर मधुन कविता बोंद्रे तर राज्य उपाध्यक्ष पदी ज्योती बांगार जिल्हा हिंगोली,शांत पवार जिल्हा सातारा आदींचा समावेश आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातून राज्य कार्यकारिणी साठी *चंद्रपूर जिल्हा कोषाध्यक्ष शिल्पा वैद्य* आणि जिल्हा संघटक *आशा नक्षिने* उपस्थित होत्या.