Home
Home Breaking News सावित्रीबाई फुले विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांना अभिवादन.

सावित्रीबाई फुले विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांना अभिवादन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे, दिनांक 12 जानेवारी 2023 ला राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रमाता जिजाऊ वंदनेने व स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनानी कार्यक्रमाची सुरुवात झाली.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणातून राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर सविस्तर माहिती सांगितली. तसेच विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांनी सांगितलेल्या विचारांचा अवलंब करावा व आदर्श नागरिक व्हावे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक संजय गाडगे, ज्योती चटप माधुरी उंमरे,राजेश मांढरे, मरसकोल्हे , आडे, आत्राम, किन्नाके ,कोगरे, मेश्राम, वासेकर यांचेसह शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन तथा आभार सेवाजेष्ठ शिक्षक महेंद्रकुमार ताकसांडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here