विमाशी चे सुधाकर अडबाले यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
नागपूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातील विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे पुरस्कृत व विविध संघटनांचा पाठिंबा असलेले सुधाकर गोविंदराव अडबाले यांनी आज दिनांक 9 -1- 2023 ला आपला उमेदवारी अर्ज नागपूर विभाग कमिशनर यांच्याकडे सादर केला त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जवाहर विद्यार्थी सभागृह येथे नागपूर विभागातील वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा व नागपूर या जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील विविध शाळेतील हजारोंच्या संख्येत शिक्षक बंधू भगिनी उपस्थित झाले जवाहर विद्यार्थी सभागृह मध्ये झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार व्ही. यु. डायगव्हाणे सर होते. सुधाकर गोविंदराव अडबाले यांना निवडून आणण्याबाबत त्यांनी शिक्षक बंधू भगिनींना आवाहन केले. सभेला विदर्भ शिक्षक संघाचे संस्थापक राजाराम शुक्ल, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्य अध्यक्ष वितेश खांडेकर, आय. टीआयचे शिवाजी ढोमणे, यंग टीचर्स असोसिएशनचे डॉ. प्रदीप घोरपडे, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष प्रदीप राठोड, नागपूर जिल्हा अध्यक्ष सचिन इंगोले, आदिवासी आश्रम संघटनेचे भोजराज फुंडे, गजाननराव गावंडे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्रावण बर्डे,डॉ. संजय गोरे, शिवाजी धुमने,खिमेश बढीये , विविध संघटनांचे पदाधिकारी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष कार्यवाह, तालुका पदाधिकारी व हजारोंच्या संख्येत शिक्षक बंधू भगिनी प्रामुख्याने उपस्थित होते. अडबाले सर यांच्या उमेदवारीला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेनी अडबाले सरांच्या उमेद वारीला त्यांचा पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले, विदर्भ शिक्षक संघ, नागपूर विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन, गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य आय टीआय निदेशक संघटना, महाराष्ट्र राज्य कला अध्यापक संघ महामंडळ शाखा वर्धा, विदर्भ कला शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य कला अध्यापक संघ महामंडळ, वोकेशनल टीचर्स असोसिएशन चंद्रपूर, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक संघ व केंद्रप्रमुख सभा, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती,भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी,विभागीय अनुदानित आदिवासी आश्रम शाळा कर्मचारी संस्कृती संघटना, महाराष्ट्र आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य, विदर्भ प्राथमिक (माध्यमिक) शिक्षक संघ नागपूर विभाग इत्यादी संघटनांचा सक्रिय पाठिंबा मिळालेला आहे सभेला शिक्षक बंधू-भगिनीचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे संचालन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष रमेश काकडे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा अध्यक्ष अनिल गोतमारे यांनी केले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *