आमदार सुभाष धोटे यांनी साधला गोंडपिपरी च्या जनतेशी संवाद. ♦️आ. धोटेंच्या हस्ते ‘संतान’ या नाटकाचे उद्घाटन व विविध मान्यवरांचे सत्कार.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गोंडपिपरी :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी तालुक्यातील मौजा गोजोली, मक्ता, चीवंडा, सोमनपल्ली, किरमिरी, हिवरा, सकमुर या गावांना सदिच्छा भेट दिली. या दौऱ्या दरम्यान त्यांनी गोंडपिपरी तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेशी संवाद साधला आणि परिसरातील शेतकरी, शेतमजुर, महिला, तरुण- तरुणी यांच्याशी हितगुज करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. स्थानिक नागरिकांनी सांगितलेल्या समस्यांचे निराकरण तातडीने करण्याचे आश्वासन दिले तसेच काही समस्यांचे निराकरण करण्यात आले.
या प्रसंगी सकमूर चेकबापूर येथील शिव – भीम एकता राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती सतमोर्चापूर यांच्या सौजन्याने मौजा सखमूर येथील छत्रपती राजे शिवाजी महाराज यांच्या पुतळा बांधकामाच्या मदतीकरिता युवा रंगमंच वडसा प्रस्तुत ‘संतान’ या नाटकाचे उद्घाटन केले. तसेच या प्रसंगी सकमुर गावातील विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या व्यक्तींचे सत्कार आ. धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, माजी सभापती सुरेश चौधरी, सकमुर चे सरपंच अर्पणाताई रेचनकर, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष विनोद नागपुरे, माजी उपसभापती अशोक रेचनकर, माजी संचालक संभुजी येलेकर, पोडसा चे सरपंच देविदास सातपुते, कार्याध्यक्ष निलेश संगमवर, नामदेव सांगडे, उपसरपंच बालाजी चनकापुरे, सरपंच वेडगाव धीरेंद्र नागापुरे, सरपंच वेजगाव नरेंद्र वाघाडे, उपसरपंच साईनाथ कोडापे, तालुकाध्यक्ष युवक संतोष बंडावार, माजी उपसरपंच अनिल कोरडे, जितेंद्र गोहणे यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *