Home
Home Breaking News ज्ञानदिप विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

ज्ञानदिप विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

 

लोकदर्शन वालुर.👉 महादेव गिरी

वालुर येथील ज्ञानदिप प्राथमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रविण क्षीरसागर होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.जे.बि.शिंदे, सौ.जि.आर.मळी, बि.बि.मोरे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांची भाषणे केली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ.जे.बि.शिंदे, सौ.जि.आर. मळी,बि.बि.मोरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवन चारीत्र्यावर प्रकाश टाकला. मुख्याध्यापक प्रविण क्षीरसागर यांच्या अध्यक्षक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.ए.महाडिक यांनी केले तर आभार व्हि.एन.बोंडे यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here