वाल्मिकेश्र्वर माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

लोकदर्शन वालुर 👉 महादेव गिरी

वालुर येथील स्व. नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मिकेश्र्वर माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून शालेय विद्यार्थ्यांनी शुभांगी कटारे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय विद्यार्थ्यांनी मिरा बेंगाळ, सितल पवार, स्वाती बुधवंत, कोमल जाधव, महात्मा फुले यांच्या वेशभूषेत मयुर गिरी, अभिषेक दराडे, तर सावित्रीबाई फुले यांच्या वेशभुषेत साक्षी दराडे, शारदा गिरी आदिं व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख पाहुण्या यांचा हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षा व प्रमुख पाहुण्या यांचा व सावित्रीबाई फुले यांच्या वेषभुषेत असलेल्या शारदा गिरी ,साक्षी दराडे व महात्मा फुले यांच्या वेशभुषेत असलेले अभिषेक दराडे, मयुर गिरी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शालेय विद्यार्थ्यांची भाषणे झाली. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मिरा बेंगाळ, कोमल जाधव ,स्वाती बुधवंत आदिंनी तसेच सावित्रीबाई फुले यांच्या वेशभुषेत असलेल्या शारदा गिरी, साक्षी दराडे, महात्मा फुले यांच्या वेशभुषेत असलेले अभिषेक दराडे, मयुर गिरी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शुभांगी कटारे यांच्या अध्यक्षीय भाषणाने समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठि वाल्मिकेश्र्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.डि.भोकरे, बि.व्हि.बुधवंत, आर.बि.राठोड, डि.आर. नाईकनवरे, एस.ए.महाडिक, व्हि.एन. बोंडे,सेवक बळीराम शेंबडे ज्ञानदिप विद्यालयाचे सहशिक्षक बि.बि.मोरे यांनी परीश्रम घेतले. फोटो आहे

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *