सिनेट निवडणुकीमध्ये राजु कलाने यांची दमदार एन्ट्री *♦️विद्यार्थ्यांच्या ग्राउंड लेव्हल वरील समस्या तथा विद्यापीठ व महाविद्यालय मॅनेजमेंट कडून होणारा त्रास हा सर्व लेखाजोखा लक्षात घेऊन घेतला निर्णय – राजू मधुकरराव कलाने

 

लोकदर्शन प्रतिनिधी 👉
(मोहित राऊत). 27 ऑक्टोबर

27 ऑक्टोबर2022अमरावती विद्यापीठाच्या 2022 सिनेट निवडणुकीची बिगुल गेल्या काही दिवसापासून वाजला होता. तेव्हा दिनांक 27 ऑक्टोबर 2022 रोजी सिनेट सदस्य पदाकरिता नामांकन दाखल करण्याची तारीख असल्याने सामाजिक चळवळ राजकीय निवडणुकांचा अनुभव तथा पत्रकारित उल्लेखनीय कामगिरी आणि सध्या कायद्याच्या क्षेत्रात शिक्षण घेणारे अत्यंत मध्यमवर्गीय घरातील युवा तरुण अशी ख्याती असणारे आणि स्वबळावर काहीतरी वेगळच करून दाखवण्याची हिंमत ठेवणारे छोटस गाव दाढी (पेढी) या अमरावती जिल्ह्यातील सुपुत्र राजू मधुकरराव कलाने यांनी आता मागील अमरावती विधानसभा 2019 नंतर 2022 साली अमरावती विद्यापीठ अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातून सिनेट सदस्य या पदाकरिता आपली उमेदवारी दाखल गेली आहे . त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सामाजिक चळवळीमध्ये तथा राजकीय निवडणुकांचा अनुभव विविध तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनात आणि स्वतः विद्यापीठ तथा संस्थांच्या विद्यालयातील स्तरावर होणारी विद्यार्थ्यांची मिरवणूक त्यांच्या समस्या आर्थिक अडचण समजून न घेणे अशा विविध समस्या स्वतः अनुभवल्या आणि इतर विद्यार्थ्यांची त्यांनी विविध स्तरावर निराकरण करण्याकरता ते प्रत्येक वेळी तत्पर राहिलेत. त्यामुळे त्यांनी आज अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदाकरिता पदवीधर मतदारसंघातून आपली उमेदवारी ही निश्चित केल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. तर उमेदवारी दाखल करणाऱ्या विविध पॅनल्स तथा अपक्ष उमेदवार यांना सदर उमेदवारीने एक जोरदार टक्कर मिळेल अशी ग्वाही राजू कलाने यांनी दिली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *