श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे दिवाळी निमित्त आदिवासी बांधवांना फराळ वाटप. आदिवासी बांधवाची दिवाळी झाली गोड.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे

 

उरण दि 24 ऑक्टोंबर 2022 समाजात असे अनेक वंचित घटक आहेत ज्यांना एकवेळचे जेवण सुद्धा मिळत नाही. तर काहीजणांना नीट घालायला कपडे सुद्धा नसतात. अशा गरिबीत सापडलेल्या आदिवासी बांधवांसोबत त्यांच्या सुख दुःखात सहभागी होत त्यांचा आनंद द्विगुणित करण्याच्या उद्देशाने श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी विविध आदिवासी वाड्यावर आदिवासी बांधवांना दिवाळीचे फराळ वाटप करून दिवाळी साजरी केली जाते.थोडे का होईना आदिवासी बांधवांचे दुःख दूर करण्याचा उद्देशाने याही वर्षी रविवार दिनांक 23/10/2022 रोजी सकाळी 8:30 वाजता चिरनेर अक्कादेवी वाडी येथे दिवाळीचे फराळ वाटप करण्यात आले.दिवाळीचे फराळ मिळाल्याने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत होता. आदिवासी बांधवांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत उपस्थित सर्वांचे आभार मानले.

यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे सल्लागार शिक्षक सुधीर मुंबईकर, अध्यक्ष सुदेश पाटील,सल्लागार कुमार ठाकूर,चिरनेर अक्कादेवी वाडीचे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सनी बोरसे, अभिनेते सुभाष कडू, महिला सामाजिक कार्यकर्त्या निकिता पाटील, सानिका पाटील, प्रेम म्हात्रे, प्रणय पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सोशल मीडिया प्रमुख साहिल म्हात्रे,प्रकाश म्हात्रे, सुमित कोळी, अंश कोळी, नमित कोळी, प्रणित पाटील, सुविध म्हात्रे, ओमकार म्हात्रे, हेमंत ठाकूर, यश म्हात्रे, आर्यन पाटील आदि श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस उपनिरीक्षक संजय पवार व सामाजिक कार्यकर्ते समीर पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *