



लोकदर्शन 👉 किरण कांबळे
दि.21 ऑक्टोबर 2022 रोजी भारतीय विद्यार्थी मोर्चा आयोजित *दीप कृतज्ञतेचा वंदन लोक राजाला* या संकल्पनेतून दिवाळीचा पहिला दिवा राजर्षी शाहू महाराज यांच्या चरणी अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून आदरणीय श्री टी व्ही नलवडे साहेब निवृत्त न्यायमूर्ती औरंगाबाद, मुंबई उच्च न्यायालय तसेच प्रमुख वक्ते म्हणून डॉ. विद्या नागावकर मॅडम होत्या. या कार्यक्रमाला छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केलेले बोर्डिंगचे अधीक्षक/ प्रशासक उपस्थित होते जसे की मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी मिस क्लार्क बोर्डिंगचे अधीक्षक सुधाकर विणकरे, अधीक्षक श्रीदेवी इंदुमती बोर्डिंगचे राजाराम कांबळे आणि शाहू महाराजांच्या वेशभूषा मध्ये मदन सरदार उपस्थित राहिले या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन किशोर मानकापूरे व प्रस्तावना किरण कांबळे तर आभार अमित कौलकर यांनी मांडले.. या संपूर्ण नियोजित कार्यक्रमाचे आयोजक भारतीय विद्यार्थी मोर्चा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष किरण कांबळे व त्यांच्या
सहकाऱ्यांनी पाहिले..!