साई मंदिर साईनगर वहाळ येथे श्री स्वामी समर्थांच्या पादुकांच्या भाविक भक्तांनी घेतले दर्शन.

लोकदर्शन उरण 👉(विठ्ठल ममताबादे )

उरण, दि. 16 ऑक्टोंबर श्री स्वामी समर्थांचा शिष्य परिवार महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असून भारतातील अनेक भाविक भक्त श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र अक्कलकोट येथे जात असतात. श्री स्वामी समर्थांनी 12 वर्षे वापरलेले चरण पादुकांचे महाराष्ट्रातील सर्व भाविक भक्तांना दर्शन घेता यावे यासाठी श्री स्वामी समर्थांचे पादुका साई मंदिर, साईनगर वहाळ येथे दिनांक 15/10/2022 दर्शनासाठी आणण्यात आले होते. श्री स्वामी समर्थाच्या चरण पादुकांचे दर्शन भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात घेतले. दर्शनानंतर उपस्थित असलेले माजी सभापती नरेश घरत व शेकापचे चिटणीस विकास नाईक यांचा साईमंदिर वहाळ तर्फे साई मंदिराचे संस्थापक रवीशेठ पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी रायगड भूषण राजू मुंबईकर यांच्यासह विविध मान्यवर, भाविक भक्तगण उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *