उभा ठाक रे*.

 

लोकदर्शन 👉रविराजे उपाध्ये, रायपुर छ ग
9300443317

अन्यायाचा बीमोड कर ही महाराष्ट्राची
हाक रे
क्रांति-मशाल घेऊन हाती उभा ठाक रे
ठाक रे !! [] १ []
खोकासुरास जाळून मारून, गाडून पुरून
टाक रे
मशाल ही करणारच आहे गद्दारीला
खाक रे….[] २ []
विघटनकारी महाशक्तीला उरला काही न
धाक रे
जनतेसमोर जाण्या त्यांना उरले नाही
नाक रे….[] ३ []
सत्तेसाठी काहीही करता, पुरता करता
शौक रे
खऱ्या समस्यावरती अबोला, ना लज्जा, ना
शोक रे…[] ४ []
मुंबई गिळण्यासाठी टपले, त्या भडव्यांना
रोक रे
धर्मा-धर्मात झगडे लावती, त्या अधमाना
ठोक रे….[] ५ []
तत्व बदलती, मते मागती, त्यांना घालू न
भीक रे
महाराष्ट्र हा पिंजून काढून करू त्यांनाही
ठीक रे ….[] ६ []
विचार कधीही संपत नाहीत, आले-गेले
अनेक रे
शांत संमयी तरी लढाऊ, नेता तुमचा
नेक रे……[] ७ []
जयचंदाच्या औलादींची , उरली न काही
साख रे
गद्दारीचा डाग न मिटणार, करतील कोशिश
लाख रे….[] ८ []
जसे पेरले तसे उगवते, संतांची सीख
ऐक रे
कपटी अन् नीच तोतयांना धडा शिकवतील
लोक रे…..[] ९ []
समता ममता विश्वबंधुता हिंदुत्वाचे
चाक रे
महापुरूषांच्या प्रबोधनाला जागून पाऊल
टाक रे……[] १० []
चहूबाजूंनी हमले होतील, लढशील पण
बिनचूक रे
प्राणपणाने संविधानाची करशील पण
जपणूक रे….[] ११ []
छत्रपतींचा बाणा अंगी तुझ्या मुळी ना
वाक् रे
काढ वाट बिनधोक रे अन् कर शत्रूस
अवाक् रे…..[] १२ []
ते करतील कट कारस्थाने, कर त्यांची
दमछाक रे
क्रांति – मशाल घेऊन हाती, हिमतीने उभा
ठाक रे…… [] १३ []

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *