*शरदराव पवार महाविद्यालय द्वारा एथेलॅटीक शिबिराचे आयोजन….*.

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
. . गडचांदुर –
शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर येथील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागातर्फ विदर्भ महाविद्यालय, गडचांदुरच्या क्रीडांगणावर महात्मा गांधीजीच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक २ ऑक्टोंबर २०२२ रोजी विद्यार्थ्यांच्या एथेलॅटीक शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनखाली शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. सतेदर सिंह यांनी सदर शिबिराचे आयोजन केले.
या शिबिराचे उद्घाटन डॉ. हेमचंद्र दुधगवळी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी , डॉ. शरद बेलोरकर, डॉ. राजेश गायधनी, डॉ.श्रीकांत पानघाटे, श्री.मंगेश करंबे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सदर शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या १००, २००, ४०० ,१५०० मीटर धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या शिबिरात व शरदराव पवार महाविद्यालय, गडचांदुर व विदर्भ महाविद्यालय जिवती येथील १४३ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शरदराव पवार महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *