कोरपना – वणी मार्ग चे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करा ,,,,,,,,,,,,,, आबिद अली यांची मागणी

कोरपना – वणी मार्ग चे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करा
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आबिद अली यांची मागणी

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना ते वणी मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करून चौपदरीकरण करण्यात यावे व
कोरपना येथील आदिलाबाद – आष्टी राष्ट्रीय महामार्गावरील
प्रस्तावित उडान पूल ओपन पद्धतीने कॉलम वर घेण्यात यावे या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आबिद अली यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कोरपना ते वणी हा चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा चाळीस किलोमीटरचा मार्ग आहे. औद्योगिक व आम रहदारी या मार्गावर मोठ्या प्रमाणात आहे. सद्यस्थितीत या रस्त्याची अतिशय दैना अवस्था झाली आहे. शिवाय हा मार्ग वणी येथून वणी – वरोरा राष्ट्रीय महामार्ग व कोरपना येथून आदिलाबाद आष्टी राष्ट्रीय महामार्गाला जोडला गेला आहे.त्यामुळे दिवसेंदिवस
वाढत्या वाहतुकीच्या दृष्टीने या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन काँक्रिटीकरण व चौपदरीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच कोरपना येथे बस स्थानक परिसरात आदिलाबाद आष्टी राष्ट्रीय महामार्ग वर उडान पूल प्रस्तावित करण्यात आला आहे, त्याचा फटका बाजारपेठेला बसू शकतो. त्या दृष्टीने येथील उडान पुल ओपन पद्धतीने कॉलम वर घेण्यात यावा अशी मागणी अली केंद्रीय मंत्री गडकरी यांना दिलेल्या निवेदनातून केली. यावर दोन्ही मागणी बाबतीत केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन दिले.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here