सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात ध्वजारोहण

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

आज दि.१५आँगष्ट २०२२रोज सोमवारला*सरस्वती शिक्षण प्रसारक* मंडळ द्वारा संचालित*उन सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, शरदराव पवार कला वाणिज्य महाविद्यालय तथा सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने *भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी ध्वजारोहण कार्यक्रम* सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष *डॉ.आनंदरावजी शं अडबाले ** यांच्या हस्ते पार पडला.
याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष *श्री तु.ता . पूजेकर*मंडळाचे सदस्य, श्री नो.शा. मंगरूळकर ,श्री मा.ना.मंदे, सदस्या श्रीमती नलिनीताई डोहे, विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे शरदराव पवार कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह, इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कु. गुडधे मॅडम यांचे सह प्रतिष्ठित नागरिक पालक वृंद , प्राध्यापक ,शिक्षक ,उच्च माध्यमिक शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थितहोते रिमझिम पाऊसाच्या हजेरीत भारताला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्राणाची आहुती देण्याऱ्या ज्ञात अज्ञात थोर क्रांतिकारकांना स्मरुन ७५ वा ध्वजारोहण सोहळा पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here