केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था महाराष्ट्र तर्फे आदिवासी बांधवासॊबत रक्षाबंधन साजरी.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 11ऑगस्ट उरण तालुक्यातील चिरनेर आदिवासी आश्रम शाळा येथे केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था महाराष्ट्रच्या माध्यमातून आदिवासी मुलांसोबत रक्षाबंधन साजरी करण्यात आली.व प्रसिद्ध उद्योगपती पी.पी.खारपाटील यांचा वाढदिवस साजरा केला गेला.रानसई खैरकाठी वाडी येथे आदिवासी महिलांना लुगडे व साड्या वाटप करून रक्षाबंधन साजरी करण्यात आली.यावेळी प्रसिद्ध उद्योगपती पी.पी. खारपाटील,राजाशेठ खारपाटील,समीरशेठ खारपाटील, महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर, कॉन संस्थेचे अध्यक्ष स्नेहल पालकर, उपाध्यक्ष संदेश घरत,मित्र परिवाराचे अध्यक्ष संपेश पाटील,सेक्रेटरी क्रांती म्हात्रे, नितेश मुंबईकर, रचित म्हात्रे,प्राध्यापक मोरे सर व इतर गुरुजन उपस्थित होते.केअर ऑफ नेचर संस्था महाराष्ट्रचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर हे आपले सर्वच उपक्रम हे आदिवासी बांधवांसोबत मिळून मिसळून साजरा करतात.यावेळीही आदिवासी बांधवांसोबत रक्षाबंधन साजरी करून केअर ऑफ नेचरचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *