माणदेशावर डॉ. कृष्णा इंगोले यांनी ” माणदेशी साहित्य ” हा अनमोल माहितीपूर्ण ग्रंथ लिहिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

 

लोकदर्शन👉 राहुल खरात

शुक्रवार दिनांक ०५/०८/२०२२ रोजी सांगोला येथे त्यांच्या निवास स्थानी भेट दिली. त्यावेळी आटपाडी येथे ११ व १२ जुलै २०२२ रोजी डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलन झाले. त्याबाबत पुढील दिशा व धोरण काय असावे व स्मारकाबाबत विस्तृत चर्चा झाली. त्यावेळी माझे सोबत आटपाडीचे यशवंत मोटे सर, दलित मित्र साबळे गुरुजी हजर होते.

डॉ. कृष्णा इंगोले हे माणदेशातील विचारवंत व कृतिशील साहित्यीक आहेत. त्यांनी माणदेशावर माणदेशी साहित्य ” हे पुस्तक लिहून प्रसिद्ध केलेले आहे. माणदेशातील १३ दुष्काळी तालुक्याच्या गावातील इतिहास, साहित्य, लोकधारा, विचारधारा, सांस्कृतिक व सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मांडणी फार अप्रतिम केलेली आहे.

माणदेशाचा इतिहास, भूगोल परीपूर्ण पणे समजून येतो त्यांचे आकलन परिपूर्ण आहे. माणदेशातील तमाम जनतेने ” माणदेशी साहित्य” हे पुस्तक आवर्जून वाचावे. त्यामुळे माणदेशाची संपूर्ण माहिती समजून येते. माणदेशी भूमीचा इतिहास व वास्तवाची जाणीव होते.

” माणदेशी साहित्य” या ग्रंथात सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडते. त्यांनी लोकसाहित्य, मध्ययुगीन संत साहित्य, भेदिक शाहीरी, तसेच आधुनिक व समकालीन साहित्याची समग्र मांडणी केलेली आहे. माणदेशाचा अभ्यासपूर्ण ग्रंथ आहे. त्यामुळे सदरचा ग्रंथ माणदेशी साहित्याचा ऐतिहासिक ठेवा असा नावलौकिक ग्रंथ ठरेल. माणदेशावर ” माणदेशी साहित्य हा ग्रंथ लिहिले बद्दल त्यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन !

पुस्तकाचे नाव :- माणदेशी साहित्य लेखक :- डॉ. कृष्णा इंगोले मो. नं.:- ९९२२६१७६२१

आपला आयु. विलास खरात सचिव साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठान, आटपाडी जि.सांगली (महाराष्ट्र). मो.नं. ९२८४०७३२७७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here