ज्ञानदिप विद्यालय व वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न”

 

लोकदर्शन वालुर👉 महादेव गिरी

वालुर येथील स्व. नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानदिप प्राथमिक विद्यालय व वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पि.पि.क्षीरसागर होते तर प्रमुख अतिथी म्हणुन प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वैशाली बहणजी ,जया बहणजी,बालासाहेब बुधवंत, जि.एम. कावळे, व्हि.एन. बोंडे, एम. एस. गिरी, बि.बि.मोरे, सौ.जि.एम. मळी उपस्थित होते. यावेळी सरस्वती पुजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी वैशाली बहन, जया बहण यांनी शालेय विद्यार्थी व शिक्षकांना राखी बांधल्या.
याप्रसंगी वैशाली बहण यांनी विद्यार्थ्यांना रक्षा बंधनाचे महत्त्व सांगितले. बि.व्हि.बुधवंत, व्हि.एन.बोंडे, बि.बि.मोरे ,एम. एस.गिरी यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचा समारोप मुख्याध्यापक पि.पि.क्षीरसागर यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जया बहण यांनी केले तर आभार जि.एम. कावळे यांनी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *