हर घर तिरंगा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली.

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदुर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय,गडचांदूर च्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अभियानांतर्गत हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन दिनांक 9 ऑगस्ट 2022 क्रांतीदिनी करण्यात आले. या रॅलीला विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. सदर रॅलीमध्ये शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे बॅनर तिरंगा घेऊन गडचांदूरवाशीयांचे लक्ष वेधले सदर रॅली शाळेपासून महात्मा फुले चौक ,गांधी चौक, संविधान चौक, साई मंदिर मार्गे शाळेत पोहोचली. याप्रसंगी क्रांती दिनाचे महत्त्व प्रा. प्रशांत खैरे यांनी विषद केले. कार्यक्रमाचे संचालन महेंद्र कुमार ताकसांडे यांनी केले.या कार्यक्रमाकरिता पर्यवेक्षक संजय गाडगे बावनकर , वासेकर , बोबडे , मेश्राम , मुप्पीडवार , जाहीर , डफाडे , गुजर ,झाडे , सातारकर ,सोनटक्के , मेहरकुरे ,कु. ताजने , कु. ताकसांडे , उंमरे मॅडम , चटप मॅडम ,श्रीमती शेंडे , तसेच लीलाधर मत्त्ते, संकल्प भसारकर,सिताराम पिंपळशेंडे शशिकांत चन्ने, गणपत आत्रम, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी सहकार्य केले .रॅलीची सांगता राष्ट्रगीताने झाली.
,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here