समरसतेची सारनाथ,बुद्धगया दर्शन यात्रा

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

चंद्रपूर:- सामाजिक समरसता मंच व एम्स परिवार लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने 75 आजादी का अमृत महोत्सव निमित्य सारनाथ,बुद्धगया,वाराणशी येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या कार्याचा जीवनपट सर्व समाजा पर्यंत पोहचविण्या करिता दर्शन यात्रा संपन्न झाली.
कार्यक्रमाला मार्गदर्शक इन्द्रेश कुमार,रमेश पांडव,निलेश गद्रे,एम्स परिवाराचे अशोक रायते, समरसता मंच चंद्रपूर डॉ नंदकिशोर मैंदळकर,प्रांत प्रमुख आनंदीदास पालेकर,प्रफुल कातरे, कैलास खैरकर,साळुंखे गुरुजी,आदी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व डॉ बळीराम हेडगेवार यांची जन्मतिथी हा एक अपूर्व योग् होता अश्या या संस्मरनिय मुहूर्तावर ‘सामाजिक समरसता मंच’ ची स्थापना पुण्यात करण्यात आली.समरसता मंचा द्वारे तथागत गौतम बुद्धाने दिलेला उपदेश प्रज्ञा,शील,करुणा, तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकवलेले स्वातंत्र्य,समता, बंधुता,समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचावे या करिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून विचार रुजविण्याचे कार्य सुरू आहे समाजामध्ये विघटनकारी तत्वे सक्रिय आहेत आणि हे विघटन रोखण्याचे कार्य सामाजिक समरस्तेच्या माध्यमातून होणे अपेक्षित आहे.बंधुभाव याचेच दुसरे नाव सामाजिक समरसता होय तथागत भगवान बुद्धाची मैत्रि व करुणा यातूनच समरासतेचा परिपोष होतो.सामाजिक समरसता निर्माण झाली असेल तर सामाजिक समता आपोआप निर्माण होते व टिकते समाजा समाजातील कटुता,अज्ञान,मतभेद,मतभेद,दूर करण्याकरिता या दृष्टीने काही ना काही तात्काळ इलाज करण्याची आवशकता आहे.तो इलाज म्हणजे सामाजिक समरसता होय.असे प्रतिपादन सारनाथ,बुद्धगया,वाराणशी दर्शन यात्रा शोहळ्यात करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here