महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदुर येथे कलंक चित्रपट प्रदर्शित

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय,गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजना द्वारा आयोजित, एच.आय.व्ही. एड्स जनजागृती अभियाना अंतर्गत महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदुर येथे “कलंक – दी इन्फॉर्मेशन ऑफ एच.आय.व्ही. एड्स” हा डॉक्युमेंटरी चित्रपट प्रदर्शित करून विद्यार्थ्यांत जनजागृती करण्यात आली. या वेळेस आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कार्यकारी प्राचार्य रामकृष्ण पटले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप घोडीले यांनी केले. या कार्यक्रमात प्रा. पवन चटारे, लेखक व दिग्दर्शक श्री. अनिकेत परसावार, निर्माता श्री. शुभम झाडे व १५० विद्यार्थी उपस्थित होते. एच.आय.व्ही. चा वाढता प्रादुर्भाव युवा वर्गात वाढत असल्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी आम्ही जनजागृती म्हणून हा माहितीपट बनवला आहे. तसेच गावोगावी जाऊन, शाळेत जाऊन, प्रोजेक्टरच्या माध्यमाने आम्ही पुढाकार घेऊन लोकांमध्ये, तरुण पुरुष स्त्रियांमध्ये जनजागृतीचा हा कार्यक्रम राबवत आहे. असे दिग्दर्शक अनिकेत परसावार यांनी सांगितले. चित्रपट पाहिल्या नंतर विद्यार्थ्यांना त्यांचा प्रतिसाद विचारल्यावर त्यांनी सांगितले की संपूर्ण माहिती आम्हाला हा चित्रपट पाहल्याने कळाली आहे. शेवटी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. चेतन वैद्य यांनी केले.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here