वरोरा येथील लाचखोर सहायक अभियंता चुक्का यांना एक दिवसाची पोलीस कोठडी

 

लोलदर्शन*👉राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : सोलर सिस्टम कीट लावण्याकरिता लागणारे डिमांड काढून देण्याच्या कामाकरीता ६ हजार रूपयांची मागणी केल्यानंतर ती लाच घेताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, ३३/११ के.व्ही, उपकेंद्र वरोरा ( बोर्डा) येथील सहायक अभियंता श्रिणु बाबु चुक्का , (वय ४३ वर्षे ) यांना लाचलुतपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूरच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्या विरुद्ध वरोरा पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा केला. आज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश र.णा. बावणकर, यांनी सहायक अभियंता चुक्का यांना एक दिवसाची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली .
वरोरा येथील रहिवासी तक्रारदार यांचा सोलर सिस्टम व इलेक्ट्रेशियनचा व्यवसाय आहे. त्यांनी ग्राहकांच्या घरी विद्युत संच ( सोलर सिस्टम ) किट लावण्याचे काम घेतले होते. तक्रारदार हे कीट लावण्याकरिता डिमांड काढण्याच्या कामाकरीता २४ जून २०२४ महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी मर्यादित ३३/११ के. व्ही उपकेंद्र वरोरा (बोर्डा) कार्यालयात गेले असता सहाय्यक अभियंता श्रिणु बाबू चुका यांनी तक्रारदाराकडे डिमांड काढून देण्याच्या कामाकरीता ६ हजार रुपयांची मागणी करुन स्वत: स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. तक्रारदाराची पैसे देण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यांनी याबाबत चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप अधिक्षक अविनाश भामरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांनी सापळा रचला आणि सोमवार, २७ जून रोजी सहायक अभियंता चुक्का यांना ६ हजार रूपयांची लाच स्वीकारताना महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी मर्यादित ( अर्बन ) कार्यालयातील त्याच्या कक्षात रंगेहाथ पकडले. त्यांना ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात वरोरा पोलीस स्टेशन येथे रात्री ८.०० वाजताच्या सुमारास भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८, सुधारित अधिनियम २०१८ कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. आज जिल्हा व सत्र न्यायालय वरोरा यांच्या न्यायालयाकडे एक दिवसाची पोलीस कोठडीची केलेली मागणी मान्य करून न्यायालयाने सहायक अभियंता चुक्का यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *