आदिवासीच्या जमिनी बेकायदेशीरपणे फेरफार केल्या प्रकरणी संबंधितावर कायदेशीर कारवाई करून पीडित आदिवासी शेतकऱ्यांना न्याय दयावा. आप चंद्रपूरची मागणी

 

लोकदर्शन 👉नितेश केराम (कोरपना प्रतिनिधी

आदिवासी समाजातील गरीब
शेतकऱ्याचा जमिनी बेकायदेशीरपणे फेरफार केल्या प्रकरणी संबंधितावर कायदेशीर कारवाई करून पीडित आदिवासी शेतकऱ्यांना न्याय
दयावा

चंद्रपूर / आम आदमी पार्टीच्या महिला अध्येक्षा अँडव्होकेट सुनीता पाटील यांच्या कडे नागभीड तालुक्यातील अकापूर येथून काही शेतकऱ्यांची शेत जमीन बेकायदेशीरपणे फेरफार केल्याची तक्रार आली होती त्या संदर्भात माननीय जिल्हाधिकाऱी यांना आदिवासी समाजातील गोरगरीब शेतकऱ्यांना ज्यांची शेती बेकायदेशीरपणे हडप केलेली आहे अशा व्यक्ती तथा अधिकारी यांच्यावर कडक करवाई करण्यात यावी तथा शेतकऱ्यांच्या जमिनी परत दयावे अशी मागणी आम आदमी पार्टी तर्फे करण्यात आलेली आहे / 20 दिवसात या संदर्भात कारवाई झाली नाही तर आम आदमी पार्टी आदिवासी शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठ आंदोलन उभारेल असे आव्हान करण्यात आले या वेळी आपचे जिल्हा अध्येक्ष सुनील देवराव भोगळे शहर सचिव राजू कुडे जिल्हा सचिव संतोष दोरखंडे युथ विंग उपाध्यक्ष ड्रॉ आहेर महिला उपाध्यक्ष जस्मिन शेख महिला सचिव आरती आगलावे कुशाल शर्मा पवन वागमारे लक्षमण पाटील वन्दना गवळी इत्यादी कार्यक्रम पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here