जान्हवी मैंदळकर हिचा अभिनंदन सोहळा

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*चंद्रपूर:-*रंजन सामाजिक मंच चंद्रपूर च्या वतीने सेंट मायकल शाळा चंद्रपूर ची विद्यार्थिनी जान्हवी प्रमोद मैंदळकर हिला दहावीच्या परीक्षेत 86.20 गुणासह प्राविण्य मिळवून यश संपादन केल्याबद्दल संस्थे तर्फे अभिनंदन सोहळा पार पडला.
कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष डॉ नंदकिशोर मैंदळकर,सुदर्शन नैताम,सुभाष नरुले, सचिन बरबटकर,गंगाधर गुरनुले,डॉ राहुल विधाते,ऍड धीरज ठवसे,नितीन चांदेकर,किशोर जंपलवार,मोहन जीवतोडेआदी उपस्थित होते.
मुलांचे करियर घडविण्याची पहिली पायरी म्हणजे दहावीची परीक्षा यात प्रत्येकांना प्राविण्य मिळावे अशी आशा असते यात प्राविण्य मिळाले की पहिली शर्यत पार केल्याचा आनंद मिळतो यात जान्हवी प्रमोद मैंदळकर हिने जिद्द,चिकाटी,मेहनत करीत एकमेव लक्ष डोळ्यासमोर ठेवल्याने यशस्वी झाली.वडिलांचा छोटासा व्यवसाय त्यात महागडे शिक्षण ही सगळी तारेवरची कसरत असते तरी पण मुलांनी शिक्षण घेऊन खूप मोठे व्हावे ही आई वडिलांची माफक अपेक्षा असतेच मग पालक त्यासाठी संसारात खूप ओढाताण सहन करतात आपल्या गरजा कमी करून इच्छा आकांशा ना मुरड घालतात.त्यात मुलांनी अभ्यासात खूप मेहनत घेऊन प्रविण्यासह पास झाल्यास पालकांचा आनंद गगनात मावेनासा होतो या यशात पालक,पाल्य,व गुरुजन यांचा फार मोठा वाटा असतो तिघांचे ध्येय एकाच असायला पाहिजे तेंव्हा निश्चितच यश पदरी पडत असते जान्हवी आपल्या मिळालेल्या यशात आम्रपाली म्याडम,विजया म्याडम,व आई वडील यांचा मोलाचा वाटा आहे तेच माझ्या यशाचे शिल्पकार आहेत असे प्रतिपादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here