जसखार गावातील रेशन धान्य दुकानाचे दिपक ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन


*लोकदअर्शन👉विठ्ठल ममताबादे*

उरण दि 24 जून
जसखार गावात रत्नेश्वरी ग्रामसंघ जसखार यांच्या वतीने आशीर्वाद स्वयं सहायता समूह यांना सरकार मान्य रेशन धान्य दुकान परवाना मिळाला आहे. त्या दुकानाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य विजय भोइर ,रेशन धान्य अधीक्षक बिराजदार, जसखार ग्रामपंचायतचे सरपंच दामोदर घरत व बचत गटाचे मदने सर हे देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी जसखार गावातील सर्व बचत गटातील महिला उपस्थित होत्या.सीआरपी प्रीती ठाकूर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here