योगसाधनेला दैनंदिन जीवनात अविभाज्य भाग म्हणून अंगीकारा! – जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर

*पतंजली योग समिती तथा भाजपा घुग्गुस तर्फे प्रयास सभागृहात जागतिक योग दिन साजरा.*

आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी घुग्घुस शहर तथा पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक प्रयास सभागृहात सामूहिक योग शिबीर पार पडला.
महर्षी पतंजली यांचे स्मरण करून दीपप्रज्वलन करत शिबीराची सुरुवात करण्यात आली.
शिबिराच्या सुरवातीला राज्यस्तरीय रक्तदाता गौरव सन्मान – २०२२ हा पुरस्कार मिळविल्याबद्दल पतंजली योग समितीच्या वतीने देवराव भोंगळे व विवेक बोढे यांचा सत्कार ही करण्यात आला.

त्यानंतर योग शिक्षक श्री. अनिल नित उपस्थितांना अनेक योग प्रकारांचे प्रात्यक्षिक करायला लावून त्याचेवर शास्त्रीयदृष्ट्या आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

याप्रसंगी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की, भारतीय प्राचीन परंपरेत योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या शरीराला शास्त्रीय पद्धतीने सशक्त करण्याचे आणि निरोगी आरोग्य राखण्याचे योग हे महत्वपूर्ण साधन आहे. मानवी शरीरास योगाचे फायदे आणि अभ्यास याबाबत जनजागृती करण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी योगाचे महत्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे आज संपूर्ण जगभरात दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो.

पुढे बोलताना, आज भाजपच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये योग दिनाचे आयोजन करण्यात झाले. कोरोना संकटामुळे योगाचे वेगळे महत्व आपल्याला कळालेही आहे. योग ही आपल्या देशाची ओळख होती, ती आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे. नियमित योग केल्याने मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते. जगभरात अनेक जण ज्ञान प्राप्त करण्यासाठी तसेच शरीर व मन तंदुरुस्त राखण्यासाठी विविध योगसाधना करत असतात. आणि आजची एकूणच परिस्थिती पाहता योगसाधनेला आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनवणे गरजेचे झाले आहे. असेही ते म्हणाले.

या योग शिबिरास, माजी जि. प. सौ. नितूताई चौधरी,बबनराव कोयाडवार,डॉ.वामन वराटे,नारायणराव सेलोकर, पुरेली मास्टरजी, विठ्ठलराव पुरटर, शंकर सिद्धम, हेमराज बोंबले, प्रविण सोदारी, हेमंत पाझारे, माजी ग्रा. पं. सदस्य साजण गोहणे, विनोद चौधरी, दिलिप रामटेके, अण्णा कदम, मधुकर मालेकर, भारत साळवे, बबनराव बोढे, पुष्पाताई रामटेके, सुशिल डांगे, धनराज पारखी, संदिप जानवे, शामराव बोबडे, गंगाराम गीऱ्हे, महेश ठेंगणे, प्रमोद येंचलवार, वंदनाताई मुडपवार, माजी ग्रा. पं. सदस्य वैशालीताई ढवस, कुसुमबाई निखाडे, कांचनताई डांगे, प्रकाश डांगे, त्रिवेणी रामटेके, रेखाताई मुके, कांचनताई डांगे, विनाताई खोरपेडे, वंदनाताई मोरवार, बालाजी धूबे, विभाकर नांदे, मदन दुर्गम, श्रीनिवास कोत्तुर, पांडुरंग थेरे, अनिल मानकर, प्रविण खोके, स्वामी जंगम, मुगलीलता गुला यांचेसह आदी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *