कृषी महाविद्यालयाकडून शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप

 

लोकदर्शन👉

चंद्रपूर : कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर मूल-मारोडा च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून अलिकडेच गरजु शेतकऱ्यांना कापसाच्या बियाणांचे मोफत वाटप करण्यात आले. वरोरा येथील कृषी संशोधन केंद्रात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता विष्णुकांत टेकाळे अध्यक्षस्थानी होते तर डॉ श्रीकांत अमरशेट्टीवार, डॉ.विलास साखरकर आणि डॉ. दिनेश नवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शेतकऱ्यांना विविध बियाणे व त्यांचे उपयोग तसेच शेतीतील पीक वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. याप्रसंगी अंशुल यादव, कुशल बहेकर, मंथन बिसेन, रूपेश कोठारी, हर्षवर्धन राजुरकर, वैभव पुनवटकर आदी विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here