रामपूर येथे नगरपरिषद निधी अंतर्गत रस्ता बांधकामाचे भूमिपूजन.

लोकदर्शन👉 मोहन भारती

१३ लक्ष ८४ हजार रुपये निधीतून होणार रस्त्याचे डांबरीकरण.

राजुरा (ता.प्र) :– राजुरा तालुक्यातील मौजा रामपूर येथे वार्ड क्रमांक ९ येथे राजुरा – सास्ती रोड पासून राजुरा नगर परिषदेच्या फिल्टर प्लांट पर्यंत च्या रस्त्याचे डांबरीकरण नगर परिषद राजुरा च्या निधी अंतर्गत करण्यात येत आहे. या विकासकामाचे भुमीपुजन पार पडले. रामपूर येथील स्थानिक रहिवासी, ग्रा प सदस्य आणि काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्या मागणीच्या अनुषंगाने नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या प्रयत्नाने सदर रस्त्याला मंजूरी मिळाली असून १३ लाख ८४ हजार रुपये निधी खेचून येथे डांबरीकरण करण्यात येत आहे.
या प्रसंगी रामपूरच्या माजी सरपंच मंजुषा खंडाळे, ग्रा प सदस्य जगदिश बुटले, रमेश झाडे, संगीता विधाते, लता डकरे, उपसरपंच सुनिता उरकुडे, लक्ष्मीताई चौधरी, सं गां नि योजनेचे सदस्य कोमल पुसाटे, सुधाकर उईके, देवराव कावळे, हारून शेख, कमलेश मनोहर, अक्षय डकरे, उज्वल, संतोष शेन्डे, राजुरा नगर परिषदेचे जे. ई. रवींद्र जामुनकर, भाग्यश्री कुरवटकर, गजानन कुबडे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here