नूपुर शर्मा व नवीन जिंदल याना धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी अटक करून कारवाई करा,,,

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ———-
देशात अशांततेचे वातावरण पसरविणारे भाजप चे प्रवक्ते नूपुर शर्मा व मीडिया प्रभारी नवीन जिंदल , यांनी जगात शांती चा संदेश देणाऱ्या मुस्लिम धर्माचे हजरत मोहममद पैगंबर याचे विषयी आक्षेपार्ह बयानबाजी केल्याने मुस्लिम समाजात त्याच्या विषयी तेढ निर्माण झाला असून याचे भारतीय सविधाना नुसार गुन्हा दाखल करून कारवाई करावी यासाठी कोरपना येथील तहसीलदार मार्फत मान.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन समस्त मुस्लिम जमात गडचांदुर तर्फे देण्यात आले . यावेळी सर्वपक्षीय मुस्लिम नेते व समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते. मुस्लिम समाज नेहमी देशात ईद निमित्त व इतर दिवशी पाच वेळ नमाज मधे देशात शांतपूर्ण वातावरण राहण्या करीता दुवा,प्रार्थना करीत असून दुसरी कडे धर्म विरोधी नेते असे जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करीत असून यावर त्वरित आळा बसवण्या साठी पंतप्रधान,गृहमंत्री,मुख्यमंत्री ,गृहमंत्री यांनी अश्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी या साठी,घुग्गुस,वणी,कोरपना, चंद्रपूर,माजरी,वरोरा भद्रावती सह देशभरात धरणे,मोर्चे, व इतर आंदोलन सुरू असून निवेदनातून नूपुर शर्मा, नवीन जींदल,यती नरसिंहमानंद याचेवर करावी करण्या ची मागणी होत आहे.यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी चे नेते सय्यद अबिद अली,सोहेल अली, मोबीन बेग,काँग्रेस चे नगरसेवक शेख निसार, शेख रऊफ भाई,शेख कादर,नासीर खान, भाई कासिम अली,शेख दस्तगीर, सोहेल शेख,नवाज बेग, मैनू बेग,युसुफ शेख,व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here