राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर* *पाच नावे चर्चेत

 

लोकदर्शन👉संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३

भारतीय निवडणूक आयोगाने आज राष्ट्रपती निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. देशाला लवकरच नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. १८ जुलैला यासाठी मतदान होणार असून २१ जुलै रोजी निकाल लागणार आहे. देशातील ७७६ खासदार आणि ४०३३ आमदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २१ जुलै रोजी मतमोजणी होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. त्याआधीच देशाच्या १५ व्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. मागील ४५ वर्षांपासून याच निवडणूक पद्धतीने राष्ट्रपतींची देशाच्या सर्वोच्चपदी निवड होत आहे. १७ जुलै २०१७ रोजी राष्ट्रपतदीपदाच्या निवडणुका झाल्या. आता राष्ट्रपतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असून जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आणि वरच्या सभागृहातील लोकप्रतिनिधी मतदान करणार आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा अवधी देण्यात येणार आहे. तर मतदानानंतर २ ते ३ दिवसांनी मतमोजणी पार पडणार आहे. राष्ट्रपतीपदासाठी सध्या माजी

लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन,
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल,
छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उईके,
तेलंगणाच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन
आणि
झारखंडच्या राज्यपाल द्रोपदी मुर्मू ही पाच नावे चर्चेत आहेत.
संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
माहिती स्रोत
दिल्ली ग्रुप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here