युवक काँग्रेसच्या उपक्रमांशी तळागाळातील युवकांना जोडणार. — शंतनू धोटे. यु. काँ. ग्रा. जिल्हाध्यक्ष.

लोकदर्शन 👉मोहन भारती

पारडी येथे युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.

कोरपना(ता.प्र) :– “माझ गाव माझी शाखा”, “यंग इंडिया के बोल” या युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात तळागाळातील युवकांना व्यापक प्रमाणात सहभागी होण्यासाठी आपण आणि आपले युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी प्रोत्साहित करणार असून त्यांना विविध उपक्रमांद्वारा काँग्रेसशी जोडणार आहोत. या माध्यमातून गावागावात युवक काँग्रेसचे एक मजबूत जाळे विणण्याचा युवक कांग्रेसचा माणस आहे. असे मत चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांनी व्यक्त केले.
” माझ गाव, माझी शाखा ” आणि ” यंग इंडिया के बोल ” या युवक काँग्रेसच्या अभियाना अंतर्गत कोरपना तालुक्यातील पारडी (जुनी) येथे ते कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते. या प्रसंगी स्थानिक युवक काँगेस च्या वतीने शंतनु धोटे यांचा नवनियुक्त ग्रामीण जिल्हाध्यक्ष झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी कृ. उ. बा. स. सभापती श्रीधरराव गोडे, माजी जि प सदस्य उत्तमराव पेचे, युवक काँग्रेसचे महासचिव प्रणय लांडे, माजी उपसरंपच इर्शाद शेख, माजी ग्रा प सदस्य गणेश गोडे, कोरपना युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रोशन मरापे, आदित्य गोडे, हंसराज मरापे, अंकुश आडे, शुभम गावंडे, प्रमोद डोके, कस्तुभ गोडे, सुनील कोहचाटे यासह युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here