कामगारांना न्याय मिळवून देण्यात इंटकचे अमुल्य योगदान. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

धोपटाळा येथे इंटक च्या वतीने जागतिक पर्यावरण दिन आणि वृक्षारोपणाचे आयोजन.

राजुरा (ता.प्र) :– वेकोली बल्लारपूर क्षेत्रा अंतर्गत राष्ट्रीय कोयला खदान महासंघ, इंटक कामगार संघटनेच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त वेकोली बल्लारपूर क्षेत्रातील मनोरंजन केंद्र, धोपटाळा येथे आमदार सुभाष धोटे, मुख्य महाप्रबंधक सव्यसाची डे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, कार्मिक प्रबंधक शैलेश माटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, सध्या पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्यासाठी विविध उपक्रम, अभियान राबविण्यात येत आहेत. यातून मोठय़ा प्रमाणात जनजागृती होत आहे. विशेषतः जलप्रदूषण, वायू प्रदूषण, जागतिक तापमान वाढ या समस्येवर मात करण्याची गरज आहे. या कामात वेकोलीने सुध्दा अधिक सक्रिय सहभाग नोंदवावा, आपण सर्वांनीही यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन केले तर भारतातील कामगार क्षेत्राचे, कामगारांचे जीवनमान मजबूत करण्यासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी ठोस निर्णय घेतलेत, त्यांनी घेतल्या राष्ट्रीयीकरणाच्या निर्णयामुळेच आज कामगार आणि कामगार क्षेत्र सुरक्षित आहे. कामगारांचे शोषण टाळण्यासाठी, कामगारांना न्याय मिळवून देण्यात इंटकचे अमुल्य योगदान राहिले आहे. तेव्हा यासर्वांची जाणिव ठेवून कामगारांनी आपल्या अधिकार व हक्कांचे रक्षण करण्यासाठी संघटितपणे संघर्ष सुरू ठेवले पाहिजे असे मत व्यक्त केले. तर वेकोली बल्लारपूर क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक सव्यसाची डे यांनी पर्यावरण संरक्षणासाठी वेकोली कडून सुरू असलेल्या कार्यांची तसेच वेकोली च्या भावी योजनांची माहिती दिली. येणाऱ्या काळात क्षेत्रात वेकोली २००० लोकांना रोजगार देणार असून मोठा सौर ऊर्जा प्रकल्प ही सुरू करणार असल्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंत एकडे यांनी केले, संचालन विजय कनकाटे यांनी तर आभार प्रदर्शन नागेश मेदार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंटकचे नेते आर आर यादव, नरसा रेब्बावार, इलिहास खान, देवेंद्र कोल्लुरी, पंकज जुलमे, महाकाली राजम, सुरेश मुठलकर, संतोष गटलेवार, जे पी बोबडे, अशोक कुडे, ब्रिजेस जंगिडवार, सिंगाराव, राजेश अवनुरी, दिलीप गिरसावडे, संतोष बडकेलवार, सुभाष चौधरी, श्रिकांत गजपाका, उमाशंकर, कोपुला, मल्लेश, श्रिकांत मोरे, आनंद मोदी, राजेंद्र मसीह, संगीता हिवराडे, योगिता भोयर, संतोष शेन्डे, हारून शेख, मंजुषा खंडाळे, रेखा लिंगे यासह इंटकचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कामगार, काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *