लोकदर्शन ÷मोहन भारती
*⛅राज्यशास्त्र प्राध्यापक परिषद नागपूर विदर्भ प्रांत व जी.बी. मुरारका कला वाणिज्य महाविद्यालय शेगाव यांचे आयोजन*
राजुरा :- विदर्भातील अग्रगण्य संस्था राज्यशास्त्र प्राध्यापक परिषद नागपूर विदर्भ प्रांत व सेठ जी.बी. मुरारका कला व वाणिज्य महाविद्यालय शेगाव जिल्हा बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 जून 2022 रोजी हवामान बदल आणि बदलते जागतिक राजकारण या विषयावर आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन शेगाव जिल्हा बुलढाणा येथे येथे करण्यात आलेले आहे.
राज्यशास्त्र प्राध्यापक परिषद नागपूर विदर्भ प्रांत यांच्या वतीने दरवर्षी विविध विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येते यावर्षी शेगाव येथे सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे असून अध्यक्षस्थानी शेगाव शिक्षण मंडळाचे संचालक सेठ संजय मुरारका हे असून किनोट स्पीकर म्हणून श्री जयंत माईणकर ब्युरो चीफ यूएनआय मुंबई असून प्रमुख अतिथी म्हणून संसद टीव्ही न्यू दिल्ली चे श्री रवींद्र सिंग शेरोन हे उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून राज्यशास्त्र प्राध्यापक परिषदेच्या अध्यक्ष डॉ. अलका देशमुख प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
एकूण तीन सत्रात चालणाऱ्या या परिषदेमध्ये पहिल्या सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉ.संदीप तोंडुलवार, मार्गदर्शक म्हणून डॉ.सुभाष गवई तर मुख्य अतिथी म्हणून डॉ.प्रतिभा भोरजार व डॉ. दिनकर चौधरी इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. तर दुसऱ्या सत्रातील विषयाकरिता अध्यक्ष म्हणून डॉ. वकील शेख ,तज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ.मंगेश आचार्य व मुख्य अतिथी म्हणून डॉ.नागेश्वर कन्नाके व डॉ.संदीप काळे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे तर तिसऱ्या सत्रातील शोधनिबंध सादर करण्यासाठी अध्यक्ष म्हणून डॉ.शरद सांभारे व मुख्य अतिथी म्हणून डॉ.नंदाजी सातपुते व डॉ. रिता दांडेकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे
समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुरारका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. एल.राठोड तर मुख्य अतिथी म्हणून डॉ. रतन राठोड, डॉ. राहुल वावगे व डॉ.संजय गोरे इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे तरी सदर परिषदेला महाराष्ट्रातील विविध विचारवंत ,लेखक, संशोधक प्राध्यापकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज्यशास्त्र प्राध्यापक परिषद नागपूर विदर्भ प्रांत व सेठ जी बी मुरारका कला व वाणिज्य महाविद्यालय शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.