जागतिक पर्यावरण दिनी विविध झाडांची रोपे ,गुलामगिरी व इतर ग्रंथ वाटप करून कोकाटे आणि जाधव करणार सत्यशोधक विवाह !

 

लोकदर्शन 👉 राहुल खरात

फलटण : फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे जागतिक पर्यावरण दिनी, रविवार  दि.5 जुन2022 रोजी दुपारी 1  वाजता महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ .रुपालीताई चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ३६ वा सत्यशोधक विवाह  अंधश्रद्धा कर्मकांड याला तिलांजली देत जेष्ठ समाजसेवक तुकाराम कोकाटे यांचे सत्यशोधक पै. उदय कोकाटे आणि सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब  जाधव यांची सत्यशोधिका सायली जाधव यांचा सजाई गार्डन ,फलटण येथे हा सोहळा पार पडणार आहे.

या सत्यशोधक विवाह सोहळ्यासाठी मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर पं.सभापती जि.प.सातारा, मा.महादेव जानकर माजी मंत्री म.राज्य, आमदार दीपक चव्हाण, फलटण-कोरेगाव,आमदार सुनील शेळके मावळ विधानसभा ,आमदार निलेश लंके पारनेर आमदार मकरंद(आबा) पाटील, वाई-खंडाळा, आमदार अमोल मिटकरी ,विधान परिषद , डॉ .प्रा.दिगंबर दुर्गाडे अध्यक्ष पी.डी.सी.बँक,पुणे ,मा.तुषार मोहिते सह आयुक्त आयकर विभाग ,मुबई ,डॉ .भारत रासकर ,ऊस विशेष तज्ञ पाडेगाव ,मा.नाथाजी राऊत ,CMD,NRG,ग्रुप पुणे , मा.तानाजी खरडे, डी.वाय.एस.पी, फलटण ,मा.संदीप जोपळे,वनपरिक्षेत्र अधिकारी , मा.हर्षाजगताप, वनपरिक्षेत्र अधिकारी (सामाजिक वनीकरण ),मा.मिलिंद नेवसे ,अध्यक्ष राष्ट्रवादी ओबीसी सेल,सातारा जिल्हा, मा.दशरथ फुले ,अध्यक्ष ,समता परिषद ,सातारा जिल्हा ,प्रा.शुभांगी शिंदे फलटणकर, एकपात्री प्रयोगकार  उपस्थित राहणार आहेत.

यावेळी सर्वाना जागतिक पर्यावरण दिन म्हणून पर्यावरण समतोल राखण्यासाठी भेट म्हणून वधु वर यांचे शुभहस्ते विविध प्रकारचे झाडे तसेच महात्मा फुले यांचे गुलामगिरी व गोविंद पानसरे  यांचे शिवाजी कोण होता ? हे ग्रंथ सर्वाना भेट दिले जाणार आहेत. यावेळी विधीकर्ते म्हणून संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक हा सत्यशोधक सोहळा नेहमी प्रमाणे पार पाडतील ,तर महात्मा फुले रचित मंगलाष्टकाचे गायन  सतीश आडेकर यांची टीम करणार आहे. या सोहळ्यासाठी अक्षता म्हणून सुगंधी फुलांचा वापर केला जाणार आहे. मोलाचे सहकार्य व आयोजन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शैक्षणिक व सामाजिक विचारमंच, चौधरवाडी तसेच पाडेगाव सामाजिक विकास फौंडेशन यांनी केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *