तब्बल सात वर्ष लोटूनही वनसडी येथील आदिवासी सांस्कृतिक सभागृहाचे काम अपूर्णच

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
———————————————–
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष तर कंत्रादाराच्या वाकुल्या
———————————————–
वनसडी :
कोरपना तालुक्यात महत्वाचे गाव म्हणून वनसडीची ओळख आहे , विविध कार्यालये वणसडी येथे आहे . त्यातच सन 2014-15 मधे वणसडी येथे आदिवासी सांस्कृतिक सभागृह मंजूर झाले व त्या सभागृहाच्या बंधकामाला सुरवात होऊन तब्बल सात वर्ष लोटले तरीही सदर भवनाचे बांधकाम पूर्ण झाले नाही…

सदर सभागृहाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेता आले असते पण भवनाचे काम अपूर्ण असल्याने याचा मनस्ताप गावकऱ्यांना होत आहे आहे ..

सदर आदिवासी सांस्कृतिक सभागृहाचे काम पूर्ण करून गावातील नागरिकांसाठी खुले करण्यात यावे अशी आग्रही मागणी होत आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here