८ वर्षात देश सुरक्षित, सक्षम, संपन्न, आत्मनिर्भर भारत उभा केला – हंसराज अहीर

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ८ वर्ष पूर्ततेच्या पर्वावर “सेवा, सुशासन व गरीब कल्याण पर्वाचा” शुभारंभ मान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड जी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी बोलताना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहिर म्हणाले की, मोदी सरकारच्या ८ वर्षाच्या काळात सरकारने देशाच्या अंतर्गत व सीमा सुरक्षेवर भर देताना सबका साथ, सबका विकास बरोबर आत्मनिर्भरता, सक्षम, संपन्न व सुरक्षित भारत निर्माण केला आहे. काश्मीर मध्ये कलम ३७० व ३५-ए हटवून राज्यात शांतता, सुव्यवस्था व कायद्याचे राज्य आणले आहे. देश पहिलेपेक्षा सुरक्षित करताना मोदी सरकारने या ८ वर्षात देशातून आतंकवाद संपवायच्या दृष्टीने सीमा सुसज्ज व मजबूतीवर भर दिला. बांग्लादेशाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा भारत-बांगलादेश काही भागांची IB-International बॉर्डर कायम केली. अशांतता असलेल्या नॉर्थ-ईस्ट सारख्या भागात शांतता प्रस्थापित करून उग्रवाद थांबविण्याचे काम ही मोदी सरकारने केले असल्याचे हंसराज अहीर म्हणाले. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, माजी महापौर अंजलीताई घोटेकर, राखीताई कंचर्लावार, वनिताताई कानडे, महामंत्री राजेंद्र गांधी, रवींद्र गुरनुले, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, माजी उपमहापौर राहुल पावडे, भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here