धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे शिष्टमंडळाने घेतली समर्पित आयोगाची भेट

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

दि 28 मे विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकाचे मागास प्रवर्ग चे राजकीय आरक्षण साठी मा सर्वोच्च न्यायालयाने विहित केलेल्या अटीची पुर्तता करने साठी गठीत केलेल्या आयोगाची धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे शिष्टमंडळाने राज्याध्यक्ष अनिलकुमार ढोले यांचे नेतृत्वाखाली भेट घेऊन चर्चा केली व नागरीकांच्या मागास प्रवर्ग चे राजकीय आरक्षण संदर्भात आपली भूमिका आयोगाला पटवून दिली.नागारीकांच्या मागास प्रवर्ग चे राजकीय आरक्षण कायम ठेऊन,त्या अंतर्गत व्हीजेएनटी साठी स्वतंत्र 11% आरक्षण ठेवणे व व्हीजे एनटी ची जात निहाय जनगणना करने साठी राज्य शासनाला शिफारस करने ची विनंती आयोगाला करण्यात आली.धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे शिष्टमंडळात राज्याध्यक्ष अनिलकुमार ढोले, उपाध्यक्ष विलास भाऊ डाखोळे, महासचिव शरद उरकुडे, कोषाध्यक्ष उज्वल रोकडे, सहसचिव रामचंद्र चुकांबे,नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष यशवंत कातरे, जिल्हा संघठक ज्ञानेश्वर बांबल, प्रसिद्ध प्रमुख श्याम ढोले यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here