बाबुपेठ परिसरातील रेल्‍वे उड्डाणपुलासाठी ५.२६ कोटी रू. निधी मंजूर झाल्‍याबद्दल भाजपा पदाधिका-यांनी नागरिकांसह साजरा केला जल्‍लोष.

 

 

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर

चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील रेल्‍वे उड्डाणपुलासाठी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने दिनांक २६ मे २०२२ रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये ५.२६ कोटी रू. निधी मंजूर करण्‍यात आला. यामुळे आनंदीत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी बाबुपेठवासीय नागरिकांसह दिनांक २६ मे रोजी सायंकाळी जल्‍लोष साजरा केला.

बाबुपेठ परिसरातील रेल्‍वे उड्डाणपुल हा बाबुपेठ वासियांसाठी अतिशय जिव्‍हाळयाचा विषय. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री पदाच्‍या काळात या पुलासाठी निधी मंजूर केला. सन २०१८-१९ मध्‍ये आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालया निधी जमा केला होता. जिल्‍हाधिकारी कार्यालयाने सदर निधी दिला नसल्‍याने जिल्‍हाधिकारी कार्यालयात जमा असलेल्‍या निधी आ. मुनगंटीवार यांनी नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना सांगून द्यावयास लावला. त्‍यामुळे या उड्डाणपुलाच्‍या बांधकामाला आता गती प्राप्‍त होणार आहे.

या निर्णयामुळे बाबुपेठ वासियांमध्‍ये मोठा आनंद निर्माण झाला आहे. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी नागरिकांसह ढोलताशे वाजवत, फटाके फोडत तसेच आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या सन्‍मानार्थ नारे देत जल्‍लोष साजरा केला. यावेळी माजी उपमहापौर राहूल पावडे, भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंद्रशेखर गन्‍नुवार, सुभाष कासनगोट्टूवार, राम लाखीयॉ, प्रदिप किरमे, सौ. कल्‍पना बगुलकर, शाम कनकम, संदीप आगलावे, रवी लोणकर, डॉ. दीपक भट्टाचार्य, विद्या बाथो, ज्‍योती गेडाम, दशरथ सोनकुसरे, दिवाकर पुध्‍दटवार, आकाश ठुसे, रेखा चन्‍ने, राजेश यादव, गणेश गेडाम, भानेश मातंगी, रवी जोगी, अमोल नगराळे, रामकुमार आकापेल्‍लीवार, सुनिल डोंगरे, संजू निखारे, अक्षय शेंडे, पराग नलोडे, रविंद्र काळे, मुकेश गाडगे, राजेंद्र दागमवार, मंगला काळे, विजय मोगरे, रवि नंदुरकर, अमित निरंजने, आकाश लक्‍कापुलवार, नंदकिशोर बगुलकर, देवराव बगखल, अशोक शेंडे, सुभाष ढवस आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *