*२७ मे* लोकनेते नितीन गडकरी यांचा वाढदिवस

लोकदर्शन👉संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३

जन्म – २७ मे १९५७ (नागपूर)

भाजप नेते नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस.

१९७६ मध्ये नितीन गडकरी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. वयाच्या २३व्या वर्षी ते भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) चे अध्यक्ष झाले. १९८९ मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेवर प्रथम निवडून गेले. २० वर्षे ते विधान परिषदेचे सदस्य होते.

महाराष्ट्रात १९९५-१९९९ या काळात भाजप शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले. त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

२००९ साली त्यांची भारतीय जनता पक्षाचे ९ वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते.

वयाच्या केवळ बावन्नव्या वर्षी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झालेले नितीन गडकरी हे पक्षाचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष होते. नितीन गडकरी हे सध्या मोदी सरकार मध्ये भूपृष्ठ वाहतूक व जहाज मंत्री आहेत.

नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
साभार
नेट

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *