उरण मध्ये उन्हाळी शिबीर द्वारे मुलांनी दिले महत्वाचे संदेश.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 20 दिनांक 20 मे 2022 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अंतर्गत उरण येथे दिनांक 12 मे ते 21 मे 2022 दरम्यान चालू असलेल्या फुटबॉल खेळाचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीरा मध्ये दिनांक 20/5/2022 रोजी द्रोणागिरी डोंगरावर ट्रेकिंगचा कार्यक्रम घेण्यात आला असून त्याच्यात भाग घेतलेल्या सर्व पालक व विद्यार्थ्यांनी सर्वांना पोस्टर द्वारे विश्व हिताचे महत्वपूर्ण संदेश दिले आहे. प्रत्येकाने रोजचा दिनचर्या मध्ये प्लास्टिक चा वापर टाळणे हे खूप गरजेचे आहे. प्राणी व विश्व पर्यावरण हिताचे आहे. असा संदेश दिला.रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व सचिन निकम यांच्या मार्गदर्शना खाली क्रीडा शिक्षक व सेव्हेन स्टार फुटबॉल अकॅडेमी उरणचे फुटबॉल प्रशिक्षक प्रवीण तोगरे, नंदिनी प्रवीण तोगरे व समस्त विद्यार्थी व पालकांनी मिळून हा उपक्रम द्रोणागिरी डोंगरावर सकाळी साफ सफाई करून सफलता पूर्वक राबविला.पर्यावरण विषयक जनजागृती करून एक चांगला संदेश सदर विद्यार्थ्यांनी समाजात पोहोचवीला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here