नगर परिषदच्या सत्ताधाऱ्या नि विरोधकांची जनहिताची मागणी फेटाळली                                                     

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

*⭕मालमत्ता व पाणी पट्टी करावरील 2 % दंड चा निर्णय कायम*

*⭕ सत्ताधारी हे जनतेच्या हिताचे विरोधात विरोधी नगरसेवक डोहे यांचा आरोप*!!

गडचांदूर — गडचांदुर नगर परिषद मध्ये मागील अडीच वर्षापासून राष्ट्रवादी कांग्रेस व आय काँग्रेसची सत्ता असून या सत्ताधार्यानी जणू नगर परिषदची वाट लावली शहरातील जनतेने मोठ्या अपेक्षाने यांचे कडे नगर परिषदची धुरा दिली. शहरातील विकास ,शहराची स्वच्छयता,जनतेच्या हिताचे निर्णय घेतील असे वाटत होते परंतु या वर पूर्णपणे पाणी फिरले.लोकांच्या अपेक्षा भांग केल्या स्वतःचा स्वार्थ जिथून साध्य होईल असेच निर्णय घेण्याचे काम चालू केले आहे शहरात पूर्वीच दारू दुकान मोठ्या प्रमाणात असताना परत नवीन दारू दुकान करिता नाहरकत प्रमाण देण्याकरिता विशेष सभा लावण्याचे काम नगराध्यक्ष सविता ताई टेकाम यांनी केले. नगर परिषद च्या फंडात पैसा नाही त्यामुळे सफाईकामगार यांचे मागिल बारा महिन्याचे वेतन थकले आहे त्याची चिंता नाही.दरवर्षी 90 टक्के नगर परिषद टॅक्स ची वसुली होणारी केवळ 30 % झाली आहे.यावर मंथन नाही.कोरोना काळात लोकांचे कम्बरडे मोडले आर्थिक घडी बिघडली त्यामुळे नगर परिषदच्या थकबाकीत वाढ झाली.शहरात अस्वच्छयता पसरली त्याची चिंता नाही.अशा वेळेस नगर परिषद कडून मालमता कर वसुली होण्या करीता नागरिकाना 2 % सूट देण्याचा निर्णय घेतला असता तर निश्चित वसुलित भर पडली असती.परंतु असे कुठले निर्णय न घेता उलट 2 % दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला.व प्रशासनाने वसुलीचा तगादा लावला.अश्या या चुकीच्या निर्णया मुळे नगर परिषदच्या वसुली वर कमालीची घट पाहायला मिळत आहे.सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळेच नगर परिषदची वाट लागली आहे.
भाजप पक्ष्याचे विरोधी नगर सेवक अरविंद डोहे यांनी सातत्याने नगराध्यक्ष यांचे कडे सदरचा निर्णय रद्द करण्याची तसेच पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थाना अनुदान किस्त देण्याची मागणी करूनही नगराध्यक्ष केवळ आपल्या पदाचा व सत्तेच्या घमंडात जाऊन विरोधी नगरसेवकांचा जाणीव पूर्वक विरोध दर्शवून निर्णय घेण्यास नकार देत असल्याने शेवटी भारतीय जनता पार्टी कडून सदरचा विषय सर्वसाधारण सभेच्या विषय सूचित विषय घेण्यास प्रशासना कडे 13 एप्रिल ला मौचा धडकवून व आमरण उपोषणाचा इशारा देऊन मागणी केल्या व वरून शेवटी प्रशासनाला आज दिनांक 20 मे ला झालेल्या सभेत विषय घेण्यास भाग पाडले.भाजपाचे नगरसेवक अरविंद डोहे यांच्या नेतृत्वात भाजपचे दलित आघाडीचे शहर अध्यक्ष प्रशांत खाडे व बबलू रासेकर यांनी दिनांक 19 मे पासून आमरण उपोषण सुरू केले.व जोपर्यंत मागण्या मंजूर करणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतल्या जाणार नाही अशी ठाम भूमिका घेतली त्याला शिवसेना गटनेता व सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला.नगर परिषद च्या समोर शेकडो महिला पुरुष यांनी सभा चालू होण्या पूर्वीच नगर परिषदच्या मुख्य गेटवर जमाव करून सदरचे विषयाचा ठराव मंजूर करण्याबाबत नारे लावून सत्ताधाऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला परंतु सत्ताधारी यानी जनतेच्या मागणीकडे पाठ फिरवली.व मालमत्ता व पाणी पट्टी करावरील 2 % कायम ठेवला.यांच्या निर्णयामुळे गडचांदूर जनतेला मोठा फटका बसणार आहे हे तेवढेच खरे नगर परिषद सत्ताधारी हे जनतेच्या हिताचे नाही हे आजच्या सभेच्या निर्णयावरून स्पष्ट झाले. त्यावेळी विरोधी नगरसेवक अरविंद डोहे,रामसेवक मोरे,सागर ठाकुरवार, शेख सरवर भाई,सौ गोरे ,सौ कोडापे नगरसेविकानी कडाडून विरोध केला.सत्तेतील सभापती अरविंद मेश्राम यानी काल उपोषणाला भेट देऊन पाठिंबा दर्शविला व आज सत्ताधाऱ्या चे बाजूनी राहून जनतेचा विरोध केला.त्यामुळे उपोषण कर्त्यांनी उपोषण कायम ठेवण्याचा निर्धार केला.व जो पर्यंत पँटप्रधान आवास योजनेच्या लाभार्थाना उर्वरित अनुदान दिले जाणार नाही तोपर्यंत उपोषण कायम राहील असे मत व्यक्त केले यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष सतीश उपलेंचिवार नगरसेवक अरविंद डोहे,रामसेवक मोरे, शिवसेना गटनेता मा सागरभाऊ ठाकुरवार, शेख सरवर भाई,सौ गोरे नगरसेविका,सौ कोडापे नगरसेविका, निलेशजी ताजने,महादेव एकरे,अरविंद कोरे,उपोषण कर्ते प्रशांत खाडे, बबलू रासेकर,संदीप शेरकी, हरिभाऊ घोरे,सौ विजयालक्ष्मी डोहे,सौ रंजना मडावी,राकेश अरोरा,कृष्ण भागवत,सोमेश्वर क्षीरसागर, देविदास पेंदोर, हितेश चव्हाण, गजानन डोंगरे,दीपक गुरनुले, गणपत बुरटकर ,जगन्नाथ कापसे,आदींची शकडो महिला पुरुष उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *