अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या सी एस आर फंडातून अमलनाला धरणातील गाळ उपासनी करून शेतकऱ्यांना पाण्याचा अधिक लाभ द्या                                                         

लोकदर्शन 👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,
जलसाठा ,भू- जल पातळी वाढणार
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
वि कॅन फौंउडेशन च्या वतीने राज्य मंत्री बच्चू कडू यांना निवेदनातून मागणी
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर:-
राज्यमंत्री बच्चू कडू चंद्रपूर जिल्याच्या दौऱ्यावर आले होते,, जिवती तालुक्यातील कोलाम गूडा येथे भेट देऊन समस्या जाणून घेतल्या,दौऱ्या दरम्यान विविध ठिकाणी भेट दिल्या, गडचांदूर लगत अमलनाला डॅम प्रकल्प अनेक वर्षा पासून आहे ,डॅम निमिर्ती नंतर संपूर्ण गाळ उपसा कधीच झालेला नाही, तसेच शेत जमिनी साठी फार कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे, गाळ उपसा झाल्यास परिसरातील भू- जल पातळी वाढेल, गाळ उपसा झाल्यास त्याचा वापर शेती मध्ये केला तर यांचा लाभ शेतकऱ्यांना जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी मदत होईल,
अमलनाला डॅमचे गाळ उपसा अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या सी.एस.आर फंडातून करावा व शेतकऱ्यांना शेती साठी पाण्याचा अधिक लाभ मिळवून देण्यासंदर्भात वि कॅन फौंउडेशन सदस्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन निवेदनातून मागणी केली असून या विषयावर
मंत्री बच्चू कडू यांच्या सोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली, निवेदन देताना वि कॅन फौंउडेशनचे डॉ.प्रवीण लोणगाडगे,प्रितेंष मत्ते, वैभव राव , भोयर, हर्षल ढवळे,शहरातील नागरिक उपस्थित होते.
,, Photo,,
[20/05, 1:18 pm] Mohan Bharati: आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते विनोद वंगणे यांना ७५ हजाराच्या धनादेशाचे वितरण.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत मदत.

राजुरा (ता.प्र) :– राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत अपघातात मृत्यू पावलेल्या स्व. लक्ष्मी विनोद वंगणे, देवाडा जि. प. शाळा देवाडा येथील विद्यार्थिनीचे पालक विनोद उद्धव वंगणे यांना आमदार सुभाष धोटे यांनी ७५,००० /- रूपयाच्या धनादेशाचे वितरित केले.
या प्रसंगी अब्दुल जमीर, संवर्ग विस्तार अधिकारी हेमंत भिंगारदिवे, गट शिक्षणाधिकारी मनोज गौरकार, शिक्षण विस्तार अधिकारी विजय परचाके, संजय हेडाऊ, श्रीराम मेश्राम, जिल्हा परिषद शाळा चे मुख्याध्यापक रवींद्र काळे यासह अनेकांची उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *